Ads Area

Krushi Yojana | विविध शेतकरी योजना महाराष्ट्र 2024

विविध शेतकरी योजना महाराष्ट्र 2024 Krushi Yojana

Krushi Yojana | विविध शेतकरी योजना महाराष्ट्र 2024
Krushi Yojana

Krushi Yojana: नमस्कार शेतकरी मित्रांनोआजच्या या ब्लॉगमध्ये आपण महाराष्ट्र व केंद्र सरकारच्या खास शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या विविध शेतकरी योजनांची माहिती बघणार आहोत.


भारतात सुमारे
 70 टक्के लोकसंख्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे. हे आपल्याला माहिती आहे. म्हणून भारताला कृषिप्रधानदेश म्हटले जाते. म्हणून  भारतीय अर्थव्यवस्थेला बळकट बनवण्यासाठी कृषी क्षेत्राचाही सिंहाचा वाटा आहे.


केंद्र सरकार आणि आपले महाराष्ट्र सरकार वेळोवेळी शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी  विविध  योजना राबवत असतात
 आणि शेतकरी बांधव या योजनांच्या माध्यमातून समस्या सोडवत असतात.

शासनाकडून विविध  शेतकरी योजना  सुरू करण्याचा उद्देश:

केंद्र सरकारनकडून सुरू करण्यात आलेल्या योजना सामान्यतः संपूर्ण भारतात राहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी राबवल्या जातात. सर्वच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती सारखी नसल्यामुळे काही शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातून चांगले उत्पादन घेता येत नाही पर्यायाने या शेतकरी बांधवांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेही कठीण होते.
अशा विविध समस्या पाहून सरकारने योजना राबविण्यास सुरुवात केली
जेणेकरून या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगली शेती करून चांगले उत्पादन घेता येईल आणि त्यांची आर्थिक स्थितीही सुधारता येईल. 


विविध शेतकरी योजना  List 2024 Krushi Yojana

1) मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना

आपल्या महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना आपल्या शेतात सिंचन करण्यासाठी सौरपंप उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे..
या योजने अंतर्गत एखाद्या शेतकऱ्याकडे जरी जुने इलेक्ट्रिक आणि डिझेल पंप असतील तरी तेही सोलर पंपमध्ये रूपांतरित केले जाणार आहेत.
जर तुम्ही एक शेतकरी आहात आणि शेतीसाठी सौरपंपाची आवश्यकता असेल तर ही योजना तुमच्यासाठी नक्कीच उपयोगाची ठरणार आहे.
या
  योजनेबद्दल  अधिक माहिती मिळावा :  मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना

2) पॉली हाऊस सबसिडी योजना

सध्या आधुनिक काळात आधुनिक पद्धतीने शेती करण्यासाठी विशेष प्रकारचे पॉलिथिन किंवा पत्र्याने झाकलेले घर असते. या   पॉलिथिनच्या   घरात विविध प्रकारच्या पिकांना अनुकूल वातावरण बनवून प्रत्येक हंगामात विविध प्रकारच्या भाज्यांचे आणि पिकांचे उत्पादन केले जाते. या पॉली हाऊसमुळे बाह्य वातावरणाचा पिकांवर कोणताही परिणाम होत नाही.
अशा आधुनिक प्रकारची शेती केल्यामुळे नैसर्गकिक आपत्तीमुळे होणारे नुकसान शेतकरी बांधवांना बऱ्याच प्रमाणात कमी करता येते. Krushi Yojana

3)  नमो शेतकरी महा सम्मान निधि योजना 

केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी  किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना एका वर्षात ₹ 6000 दिले जातील. त्याचप्रमाणे आता महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेंतर्गत राज्यातील शेतकरी बांधवांना एका वर्षात ₹ 6000 मिळणार आहेत. म्हणजेच आता शेतकरी बांधवांना नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे ₹ 6000 आणि किसान सन्मान निधी अंतर्गत ₹ 6000 मिळतीलअशा प्रकारे शेतकऱ्यांना 1 वर्षात ₹ 12000 रुपयांचा लाभ मिळेल.
या
  योजनेबद्दल  अधिक माहिती मिळावा :  नमो शेतकरी महा सम्मान निधि योजना  

4) कृषी यांत्रिकीकरण योजना

राज्यात कृषी यांत्रिकीकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत कृषी यांत्रिकीकरण   योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत राज्यातील शेतकर्‍यांना शेतीशी संबंधित मुख्य उपकरणांच्या खरेदीवर 80% पर्यंत अनुदान मिळू शकते. शेती संबधी उपकरणांच्या महागाईमुळे अनेक शेतकरी आवश्यक उपकरणे खरेदी करण्यापासून वंचित राहतात म्हणून त्यांना पारंपरिक शेतीच करावी लागतेत्यामुळे त्यांचे उत्पादन कमी होते आणि मोठ्याप्रमाणावर नुकसान सहन करावा लागतो.


शेतकरी बांधवांना कमी श्रमात आणि कमी खर्चात अधिक पिके घेता यावीत तेसच
  पिकांचे उत्पादन वाढावे म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारने शेतकऱ्यांना कृषी उपकरण खरेदीला प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे आणि हा उद्देश पूर्ण करण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण योजना सुरु करण्यात आली आहे.
या
  योजनेबद्दल  अधिक माहिती मिळावा :  कृषी यांत्रिकीकरण योजना

5) राष्ट्रीय कृषी विकास योजना

केंद्र सरकारने  2007 साली राष्ट्रीय कृषी विकास योजना सुरू केली. या योजनेद्वारे कृषी आणि संबंधित क्षेत्राचा सर्वांगीण विकास सुनिश्चित केला जाणार आहे. त्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आपापले कृषी आणि संबंधित क्षेत्र विकास उपक्रम निवडणार आहेत
या योजनेचा मुख्य उद्देश कृषी आणि संबंधित क्षेत्रांचा विकास करणे आहे. त्यासाठी कृषी व्यवसाय उद्योगाला चालना दिली जाणार आहे. या योजनेद्वारे कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा निर्माण केल्या जाणार आहेत आणि दर्जेदार निविष्ठा
साठवणूकबाजारपेठसुविधा इत्यादींमध्ये प्रवेश सुनिश्चित केला जाऊ शकतो. या योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या गरजेनुसार योजना तयार करण्यात येणार आहे.
या
  योजनेबद्दल  अधिक माहिती मिळावा :  राष्ट्रीय कृषी विकास योजना 



6) मागेल त्याला शेततळे शेतकरी योजना महाराष्ट्र 2023

राज्यातील बहुतेक शेतकऱ्यांचे पिके पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात  तसेच काही वेळा अतिवृष्टीमुळे किंवा कमी पावसामुळे शेतकऱ्यांची पिके नष्ट होतात म्हणून शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणावर नुकसान होते पर्यायाने शेतकऱ्यांना योग्य उत्पादन घेता येत नाही आणि त्यामुळेच राज्यातील बहुतेक गरीब शेतकरी आर्थिक अस्थिरतेने त्रस्त आहेत.  अश्या गरीब शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून विविध योजना सुरू केल्या गेल्या आहेत. आणि मागेल त्याला शेततळे योजना ही त्यातील एक योजना आहे.
शेतकऱ्यांना आपल्या शेतात या योजनेअंतर्गत तलाव बांधण्यासाठी
 50,000 रुपयांची आर्थिक मदत Maharashtra सरकारकडून केली जाणार आहे. Krushi Yojana

7) पीएम प्रणाम योजना

केंद्र सरकारची ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे. शेतीमध्ये रासायनिक खतांच्या जागी पर्यायी खतांना प्रोत्साहन देणे आणि सरकारवरील अनुदानाचा बोजा कमी करणे हे या योजनेचे मुख्य उद्देश आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी आपल्या सेंद्रिय शेतात उत्पादित केलेले उत्पादनाच्या मार्केटिंगवरही सरकार भर देणार आहे  म्हणजे या योजनेद्वारे थेट  शेतकऱ्यांना लाभ मिळू शकेल.
या योजनेद्वारे सल्फर कोटेड युरियाच्या आणि नॅनो युरियाचा वापराला प्रोत्साहन देण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार सेंद्रिय शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनांच्या मार्केटिंगवरही भर देणार आहे.

8) शेतमाल तारण योजना

शेतमाल तारण योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे  शेतकऱ्यांचा शेतमालाचे योग्य ठिकाणी साठवणूक करून जेव्हा चांगला बाजारभाव मिळेल त्या वेळेला बाजारात आणणे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याच्या शेतमालासाठी योग्य भाव मिळू शकेल.
या योजनेद्वारे शेतकरी बांधव आपला शेतमाल कृषी उत्पन्न बाजार समितीत तारण ठेऊ शकतात व त्याबदल्यात चालू हंगामातील शेती करण्यासाठी कर्ज मिळवू शकतात.
या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे
 शेतकरी बांधवाना कमी बाजारभावाने माल विकावा लागणार नाही तसेच शेतीसाठी कर्ज उपलब्ध झाल्यामुळे चालू हंगामातही शेती करता येईल.

9) मागेल त्याला विहीर योजना

राज्यात नेहमीच्या पडणाऱ्या दुष्काळामुळे ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांच्या शेतीवर विपरीत परिणाम होत आहे. शेतकऱ्यांना पिकांच्या उत्पादनासाठी भरपूर पाण्याची आवश्यकता असते म्हणून सिंचनाशिवाय शेतकऱ्यांची पिके नासाडी होतात.
राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थितीवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने मागेल त्याला विहीर ही योजना सुरू केली आहे. या योजनेद्वारे राज्य
  सरकारने विदर्भातील 5 जिल्ह्यात सिंचन विहिरींचा कार्यक्रम घेण्यास मंजुरी दिली आहे.

10)  प्रधानमंत्री फसल बिमा   योजना

दुष्काळामुळे शेतकरी बांधवांच्या पिकाचे नुकसान झाल्यास अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पिक विमा संरक्षण देण्याची तरतूद प्रधानमंत्री फसल बिमा  योजनेअंतर्गत करण्यात आली आहे.
आतापर्यंत या प्रधानमंत्री फसल बिमा योजनेच्या माध्यमातून देशातील शेतकरी बांधवाना १.८ लाख कोटी रुपयांची विमा दाव्याची रक्कम देण्यात आलेली आहे.
देशातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ मिळावा हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. जेणेकरून नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान भरून काढता येऊ शकेल.
प्रधानमंत्री फसल बिमा
  योजना  सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बांधवांना पिकांच्या नुकसानीला सामोरे जावे लागते म्हणून त्यांना आर्थिक मदत करणे हा आहे. म्हणून शेतकरी बांधवाना नवीन आणि आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब करण्यास प्रोत्साहन मिळेल आणि त्यातून चांगले उत्पन्न मिळवता येईल.
या
  योजनेबद्दल  अधिक माहिती मिळावा : 
प्रधानमंत्री फसल बिमा योजना 



11)  प्रधानमंत्री कृषी सिचाई योजना

आपल्या देशातील शेतकरी बांधव शेतीसाठी पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत परंतु पावसाची अनियमितता आणि अपुऱ्या पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
पिकांना योग्य प्रमाणात पाणी न मिळाल्यास ते खराब होतात. त्यामुळे शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागते. शेतकऱ्यांची हि समस्या लक्षात घेऊन भारत सरकारने प्रधानमंत्री कृषी सिंचाई ही योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत देशातील प्रत्येक शेतापर्यंत पाणी पोहचविण्याचा सरकारचा निश्चय आहे. याद्वारे
जलस्रोतांचा जास्तीत जास्त वापर करण्यावर अधिक भर देण्यात आला आहे.  त्यामुळे दुष्काळ आणि अपुऱ्या पावसामुळे होणारे शेतीचे नुकसान टाळता येऊ शकेल.
या
  योजनेबद्दल  अधिक माहिती मिळावा : 
प्रधानमंत्री कृषी सिचाई योजना

12)  सौर कृषि वाहिनी योजना

आपल्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडतर्फे ( MSEDCL)  मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड ही शासकीय वीज वितरक कंपनी शेतकर्‍यांना स्वतःच्या शेत जमिनीवर सौर पॅनेल बसवणार आहेत आणि दिवसा वीज पुरवणार आहे. 
या योजनेंतर्गत सुमारे 2 ते 10 मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प कृषीबहुल भागात उपकेंद्रांच्या 5 किमी परिसरात राबविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासनाने सौर कृषी वाहिनी योजना (
Saur Vahini Yojana) सुरू करण्याचा  मुख्य उद्देश राज्यातील शेतकऱ्यांना स्वस्त दरात वीज उपलब्ध करून देणे हा आहे. याद्वारे राज्यातील गरीब शेतकऱ्यांना विजेचा खर्च भागवता येईल आणि त्यांना सहज वीज उपलब्ध होऊ शकेल. या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेतून राज्यातील शेतकऱ्यांना वीज देण्यासाठी सौरऊर्जेचा वापर केला जाणार आहे.
या
  योजनेबद्दल  अधिक माहिती मिळावा : 
सौर कृषि वाहिनी योजना

13)  प्रधानमंत्री किसान संपदा योजना  

ही योजना केंद्र सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारे ( MINISTRY OF FOOD PROCESSING INDUSTRIES)  राबविण्यात येणार आहे. या योजनेद्वारे अन्न प्रक्रिया उद्योगाच्या विकासाला चालना देण्याचा सरकारचा मुख्य उद्देश आहे.
PM किसान संपदा योजना हे एक सर्वसमावेशक पॅकेज आहे. या योजनेद्वारे फार्म गेटपासून रिटेल आउटलेटपर्यंत कार्यक्षम पुरवठा साखळी व्यवस्थापनासह आधुनिक पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर तयार केल्या जाणार आहेत.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी ही योजना प्रभावी ठरणार आहे. या योजनेद्वारे देशातील अन्न प्रक्रिया क्षेत्राचा विकास होणार आहे तसेच शेतकऱ्यांना चांगला परतावाही मिळणार आहे.
या
  योजनेबद्दल  अधिक माहिती मिळावा :  प्रधानमंत्री किसान संपदा योजना  

14)  किसान क्रेडिट कार्ड योजना

सरकारच्या किसान क्रेडिट कार्ड योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड दिले जात आहेत.  याचा उपयोग शेतकरी बांधव शेतीसाठी कर्ज घेण्यासाठी करू शकतात. त्याचप्रमाणे हे किसान क्रेडिट कार्ड शेतकऱ्यांना ATM मधून पैसे काढण्यासाठी उपयोगी पडणार आहे.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area